Prashant Koratkar । इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आज त्याच्यावर कोर्टात सुनावणी पार पडली.
कोर्टाने आज कोरटकरला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रशांत कोरटकरकडे असणाऱ्या रोल्स रॉईस कारबद्दल त्याने काहीच माहिती दिली नाही. अशातच आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ही अलिशान कार चीटफंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मोतेवारच्या समृद्ध जीवन घोटाळ्याचा तपास सीआयडी करीत असून सीआयडीने कोल्हापूर पोलिसांना पत्र लिहून कोरटकरकडे असणाऱ्या कारबाबत चौकशी करण्याची विनंती केली आहे.
याबाबत प्रशांत कोरटकर माहिती देत नाही. असे असल्याने कोरटकरचा तो मित्र खरंच मोतेवार आहे की कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. महेश मोतेवारच्या मालत्तांपैकी एक असणाऱ्या या अलिशान कारचा लीलाव होणार होता.
Prashant Koratkar Rolls Royce car controversy
पण काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ती कार दुसऱ्या व्यक्तीला विकली होती. त्या व्यक्तीकडून ही कार कोरटकरकडे आली. पण याबाबत कोरटकर काहीच बोलत नाही. अशातच आता ही कार जप्त होणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :