Share

“Santosh Deshmukh यांची हत्या मुंडे आणि कराडच्या सांगण्यावरून”; बड्या नेत्याचा गंभीर आरोप

by MHD
Ambadas Danve alligation on Walmik Karad and Dhananjay Munde over Santosh Deshmukh murder case

Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) यांना मारहाण करताना आरोपी महेश केदार याने त्याच्या फोनमध्ये देशमुखांना मारहाण करताना असतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले होते. या सर्व गोष्टी पोलिसांनी रिकव्हर केल्या आहेत.

सुग्रीव कराड याच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेला (Sudarshan Ghule) मारहाण झाली तर सुग्रीव कराडच्याच सांगण्यावरून संतोष देशमुखांनी घुलेला मारहाण केली. आरोपी कृष्णा आंधळेने सुग्रीव कराडचं नाव सांगितलं, असे आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारने जबाबात सांगितले आहे.

सुग्रीव कराड हा केजमधील रहिवासी आहे, तो गुंड असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून झाली. आता फक्त दोघांच्या सांगण्यावरून हत्या केल्याचा विषय येणे अद्याप बाकी आहे. चौकशीमध्ये सर्व माहिती समोर येईल,” असा दावा अंबादास दानवे यांनी केला.

Ambadas Danve on Dhananjay Munde

दरम्यान, अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केल्याने राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर आता धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

A senior leader has alleged that Santosh Deshmukh was murdered on the orders of Valmik Karad and Dhananjay Munde.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now
by MHD