Poco F7 Series । जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पोकोने आपली नवीन F7 सीरिज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीकडून धमाकेदार फीचर्स दिले आहेत.
कालच पोकोने Poco F7 Ultra आणि Poco F7 Pro हे फोन लाँच केले आहेत. किमतीचा विचार केला तर पोको F7 अल्ट्रा 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 599 $ म्हणजेच 51,284.28 रुपये (Poco F7 Ultra Price) आहे, तर 16GB रॅम + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 649 $ म्हणजेच 55,565.11 रुपये इतकी आहे. हा फोन ब्लॅक आणि यलो रंगात खरेदी करता येईल.
पोको F7 प्रो च्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 449 $ म्हणजेच 338,441.81 रुपये (Poco F7 Pro Price) आहे तर 12GB रॅम + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 499 $ म्हणजेच 42,718.98 रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि सिल्व्हर रंगात खरेदी करता येईल.
Features of Poco F7 Ultra
पोको F7 अल्ट्रामध्ये 6.67-इंचाचा WQHD+ (1,440×3,200 पिक्सेल) फ्लो AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 3,200 nits पीक ब्राइटनेस मिळेल. स्नॅपड्रॅगन 8 एलिट SoC प्रोसेसर आणि रॅम 16GB पर्यंत LPDDR5X आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप म्हणजे 50MP प्रायमरी + 50MP टेलीफोटो + 32MP अल्ट्रा-वाइड, 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यात बॅटरी 5,300mAh ची असेल.
Features of Poco F7 Pro
पोको F7 प्रो मध्ये डिस्प्ले 6.67-इंचाचा WQHD+ (1,440×3,200 पिक्सेल) फ्लो AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 3,200 nits पीक ब्राइटनेस असेल आणि प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 SoC असेल. यात रॅम 12GB पर्यंत आणि स्टोरेज 512GB पर्यंत मिळेल. कॅमेरा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप 50MP प्रायमरी + 8MP अल्ट्रा-वाइड, 20MP फ्रंट कॅमेरा आणि बॅटरी 6,000mAh ची असेल.
महत्त्वाच्या बातम्या :