Share

Shreyas Talpade ला अटक होण्याची शक्यता? फसवणुकीचा गुन्हा दाखल

Shreyas Talpade is said to be on the verge of arrest. A case of cheating has been registered against him.

by MHD

Published On: 

FIR filed against Shreyas Talpade

Shreyas Talpade । अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे ‘पुष्पा’ (Pushpa) आणि ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या आवाजात श्रेयस तळपदेनं जोरदार पुनरागमन केले आहे.

या दोन्ही चित्रपटात प्रेक्षकांना जितका अल्लू अर्जुनचा अभिनय आवडला तितकाच श्रेयस तळपदेचा आवाज देखील सर्वांना आवडला. पण श्रेयस तळपदेवर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या कंपनीमध्ये श्रेयस तळपदे काम करत होता. त्या चिट फंड कंपनीचं नाव LUCC असून या कंपनीनं लोकांना पैसे कमविण्याचं स्वप्न दाखवून करोडो रुपयांची रक्कम वसूल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशातील महोबाच्या श्रीनगर पोलिस ठाण्यात श्रेयस तळपदे याच्यासह समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके शेट्टी, दालचंद कुशवाह, सुनील विश्वकर्मा, संजय मुदगिल, ललित विश्वकर्मा, सचिन रायकवार, महेश रायकवार, मोहन कुशवाह, कमल रायकवार, सुनील रायकवार, जितेंद्र नामदेव, नारायण सिंह राजपूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

FIR against Shreyas Talpade

दरम्यान, द लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही कंपनी मागील 10 वर्षांपासून महोबा येथे कार्यरत होती. अशातच आता कलम 419 आणि 420 अंतर्गत सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही