Share

श्रेयस तळपदेला नाकारलं होतं होम लोन, शाहरुखच्या एका सहीने संध्याकाळपर्यंत फिरवली चक्रं!

बँकेने होम लोन नाकारल्यानंतर श्रेयस तळपदेच्या मदतीला फराह आणि शाहरुख खान आले. शाहरुखच्या एका पत्राने अवघ्या काही तासांत श्रेयसचे होम लोन मंजूर झाले.

Published On: 

Shreyas Talpade Shah Rukh Khan - Shreyas Talpade sharing home loan story with Farah Khan

एखाद्या सामान्य माणसाला बँकेतून होम लोन मिळवणं किती कठीण असतं, हे वेगळं सांगायला नको. पण तुम्हाला माहितीये का, की बॉलिवूडमधल्या एका लोकप्रिय अभिनेत्यालाही स्वतःच्या हक्काच्या घरासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागले होते?

होय, आपण बोलतोय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल (Shreyas Talpade). मुंबईत घर घेण्याचं त्याचं स्वप्न होतं, पण बँकेने त्याला चक्क होम लोन नाकारलं होतं. अशा वेळी त्याच्या मदतीला धावून आला तो बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान (Shah Rukh Khan)!

Shreyas Talpade Home Loan

नुकतीच दिग्दर्शिका फराह खानने तिच्या युट्यूब चॅनलसाठी श्रेयसच्या घरी जाऊन एक व्लॉग शूट केला. याच गप्पांदरम्यान श्रेयसने जुन्या आठवणींना उजाळा देत एक भन्नाट किस्सा सांगितला.

श्रेयसने सांगितलं की, तो एकदा बँकेत होम लोनसाठी गेला होता. पण तो त्यासाठी पात्र ठरला नाही. तेव्हा तिथल्या एका महिला अधिकाऱ्याने त्याला विचारलं की तो सध्या कोणत्या चित्रपटात काम करतोय. श्रेयसने ‘ओम शांती ओम’चं नाव घेतलं.

त्या चित्रपटात शाहरुख आणि फराह खान असल्याचं ऐकल्यावर त्या महिलेने श्रेयसकडे त्यांच्या एका पत्राची मागणी केली. श्रेयसने लगेच फराहला फोन लावला आणि आपली अडचण सांगितली.

फराहनेही वेळ न दवडता अवघ्या दोन दिवसांत शाहरुख खानची स्वाक्षरी असलेलं एक पत्र त्याला आणून दिलं. आणि काय आश्चर्य! ज्या बँकेने आधी नकार दिला होता, त्याच बँकेने शाहरुखची सही असलेलं पत्र पाहताच त्याच दिवशी संध्याकाळी श्रेयसचं होम लोन मंजूर केलं.

हा किस्सा ऐकून फराहलाही खूप आनंद झाला. पण नेहमीच्या मिश्कील अंदाजात ती म्हणाली, “बरं झालं तुला लोन मिळालं, कारण आम्ही तुला त्या चित्रपटासाठी फारच कमी पैसे दिले होते.” हे ऐकताच श्रेयस आणि त्याच्या पत्नीला हसू आवरलं नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही