RCB vs CSK । आज आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore) यांच्यात पार पडणार आहे. आज दोन्ही संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. यात कोणाला यश मिळते? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
2008 मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) दारुण पराभव केला होता. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एकदाही चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना जिंकता आला नाही.
आरसीबी आणि सीएसके यांच्यातील आजचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेपॉक स्टेडियमवर होणार असून येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड आहे. असे असल्याने चांगल्या धावसंख्या उभारणे हे फलंदाजांसमोर एक मोठं आव्हान आहे.
या मैदानावर आतापर्यंत एकूण 78 आयपीएल सामने खेळवण्यात आले असून त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 46 सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने आतापर्यंत केवळ 32 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
RCB vs CSK IPL 2025 Match Where To Watch On TV?
आरसीबी आणि सीएसके यांच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
RCB vs CSK IPL 2025 Match Live Streaming Details
आरसीबी आणि सीएसकेचे सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.
Royal Challengers Bangalore Squad For IPL 2025
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल साल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिखारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
Chennai Super Kings Squad For IPL 2025
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजनप्रीत सिंग, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
महत्त्वाच्या बातम्या :