Manoj Jarange Patil । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आपण केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी दिली आहे. यामुळे वाल्मिक कराड अडचणीत आला आहे.
यावर आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणी नव्याने चौकशी व्हावी. हे सरकार अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना वाचवत असून सामूहिक कटात मुंडेंना सहआरोपी करा,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
“संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्यांना सहआरोपी का केले नाही? मुंडेंना सहआरोपी करत या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा,” अशी देखील मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
“धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मुंबई आणि परळीमधील बैठक झाली,” असा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापू शकते.
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
सुदर्शन घुले याने खुनाची कबुली देताच मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. यावर आता धनंजय मुंडे त्यांना प्रत्युत्तर देतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :