Anjali Damania । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील (Santosh Deshmukh murder case) तीन आरोपींनी म्हणजे सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपणच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते.
अशातच आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सुदर्शन घुलेची (Sudarshan Ghule) कबुली म्हणजे वाल्मिक कराडला (Walmik Karad) वाचवण्याचा प्रयत्न आहे. खरंच कबुली जबाब असेल तर खटल्याची प्रक्रिया सोपी होते,” असे दमानिया म्हणाल्या.
हा कबुली जबाब जर पोलिसांसमोर दिला असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. तो जर कलम १६४ अंतर्गत न्यायाधिशांसमोर दिला असल्यास तो ग्राह्य धरला जाईल. हा खटला फास्टट्रॅक कोर्टमध्ये असून आरोपींनी कबुली दिली असल्याने यात काही विशेष अडथळे येतील असे वाटत नाही,” असे अंजली दमानियांनी स्पष्ट केले.
Anjali Damania target Dhananjay Munde
“धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना देखील या प्रकरणात सहआरोपी केलेच पाहिजे. कारण याचा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर हे लक्षात येत आहे की, या घटनेला अनेकांनी छुपी मदत केली होती,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
“यात बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळ, राजेश पाटील, प्रशांत महाजन हे पोलीस अधिकारी देखील आहेत. पण यांच कोणाचचं नाव आत्तापर्यंत चार्जशीटमध्ये आले नाही. या सर्वांना सहआरोपी करा,” अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :