Share

आरोपींनी हत्येची कबुली देताच Dhananjay Deshmukh यांची मोठी मागणी, म्हणाले; “त्या सर्व आरोपींना फाशी…”

by MHD
Accused confession to Santosh Deshmukh murder Dhananjay Deshmukh give First Reaction

Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणाला चार महिने पूर्ण होत आली तरीही त्यांना अजून न्याय मिळाला नाही. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

यामुळे देखील संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. काल या प्रकरणाची दुसरी सुनावणी पार पडली. यावेळी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी आपणच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली.

यामुळे वाल्मिक कराड (Walmik Karad) हा चांगलाच अडचणीत आला आहे. यावर आता संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या आरोपींनी चार महिन्यानंतर संतोष देशमुख हत्येची कबुली दिली आहे. न्यायासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला,” असे धनंजय देशमुख म्हणाले.

“आम्ही समाधानी आहोत, असे म्हणणे घाईचे होईल. जोपर्यंत या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही समाधानी म्हणणे घाईचे होईल,” अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

Dhananjay Deshmukh demand in Santosh Deshmukh murder case

पुढे ते म्हणाले की, “आरोपी कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करा. तसेच सर्व आरोपींना फाशी द्या,” अशी मोठी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे आता धनंजय देशमुख यांच्या या मागण्या मान्य होतात की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Accused Sudarshan Ghule, Jayaram Chate and Mahesh Kedar confessed that they killed Santosh Deshmukh. Dhananjay Deshmukh has reacted to this.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now