Jio । रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे. कंपनीकडे आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्लॅन्स आहेत, यातील काही प्लॅन महागडे आहेत तर काही प्लॅन्स (Reliance Jio Plan) हे स्वस्त आहेत. परंतु, अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध असल्याने कोणता रिचार्ज प्लॅन घ्यायचा हे अनेकांना माहीत नसते.
Jio recharge plan with 336 days validity
तुम्ही दर महिन्याला रिचार्ज करत असाल तर तुमच्यासाठी एक स्वस्त प्लॅन (Jio recharge plan) आहे. जर तुम्ही 2000 रुपयांपेक्षा कमी वार्षिक वैधतेसह येणार रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर आपण जिओचा 336 दिवसांचा रिचार्ज प्लॅन करू शकता.
किमतीचा विचार केला तर 1 वर्षाच्या वैधतेसह येणाऱ्या रिचार्ज प्लॅनची किंमत कंपनीने केवळ 1,748 रुपये ठेवली आहे. यासह तुम्हाला बरेच फायदे मिळतील. 1,748 रुपये रिचार्ज प्लॅनसह तुमच्यासाठी अमर्यादित कॉलिंग लाभ देण्यात येतात.
हा प्लॅन एकूण 3600 एसएमएस सुविधांसह येतो. हा प्लॅन जिओचे अॅप्स निवडण्यासाठी विनामूल्य सदस्यता प्रदान करते. इतकेच नाही तर तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड सारख्या अॅप्सना विनामूल्य सदस्यता मिळेल.
Jio 336 daysrecharge plan benefits
हे लक्षात घ्या की हा प्लॅन डेटा बेनिफिटबरोबर येत नाही. जर तुम्ही वायफाय वापरकर्ता असाल तर हा प्लॅन खास तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि किफायतशीर असू शकते. त्यामुळे जर तुम्ही या रिचार्जचा लाभ घेतला तर तुम्हाला वर्षभर रिचार्ज करावा लागणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :