Share

Jio । स्वस्तात मस्त! कमी किमतीत मिळेल हायस्पीड 5G डेटासह अनेक जबरदस्त फायदे, त्वरित करा रिचार्ज

by MHD
Jio | recharge offer

Jio । भारतात रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जर तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला आता कमी किमतीत हायस्पीड 5G डेटासह (Jio 5G Offer) अनेक जबरदस्त फायदे मिळतील. (Jio recharge)

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये (Jio recharge plan) ग्राहकांना एकूण 28 दिवसांची मुदत मिळते. यामध्ये 42 GB डेटा मिळतो. तसेच कंपनी हायस्पीड 5G डेटा ऑफर करत असून डेटाशिवाय तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 एसएमएस फ्री मिळतील. इतकेच नाही तर तुम्हाला दररोज 1.5 GB डेटाचा वापर करता येईल. याशिवाय तुम्हाला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ क्लाऊडचे सब्सक्रिप्शन अगदी फ्री मिळेल.

हे लक्षात घ्या की जिओ सिनेमाचा साधा प्लॅन मिळतो. समजा तुम्हाला प्रीमियम प्लॅन पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. तुम्हाला आता जिओ सिनेमावरील प्रीमियम कंटेंट अवघ्या 29 रुपयांच्या मासिक खर्चात पाहायला मिळेल. जिओ एकापेक्षा एक कंटेंट स्ट्रीम करण्याची संधी देते. यामध्ये नवीन चित्रपटापासून ते टीव्ही कार्यक्रम, शो, विना जाहिराती पाहायला मिळतील.

Jio 5G Recharge Offer

दरम्यान, ही कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर घेऊन येत असते. यामुळे ग्राहकांमध्येही मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukhesh Ambani) यांनी जिओ (Reliance) लॉन्च केल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात नवीन क्रांती झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Reliance Jio has come up with a great offer specially for its customers. Which you can avail at low cost.

Marathi News Technology

Join WhatsApp

Join Now