Marco Box Office Collection । साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) चा ‘पुष्पा 2’ सिनेमा अजूनही प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवत आहे. (Pushpa 2 Box Office Collection) या सिनेमाने अनेक विक्रम मोडत आतापर्यंत करोडोंचा गल्ला जमवला आहे. पण या सिनेमाला साऊथच्याच सिनेमानं कडवी टक्कर देत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
या सिनेमाचं नाव आहे ‘मार्को’. (Marco) या सिनेमाने ‘पुष्पा 2′ नंतर काही दिवसांपूर्वी वरुण धवन मुख्य भूमिकेत असणाऱ्या बेबी जॉन’ या सिनेमालाही मागे टाकले आहे. चकित करणारी बाब म्हणजे, रिलीज झाल्यापासून मार्कोनं 13 दिवसांत दुप्पट कमाईचा आकडा पार केला आहे. माहितीनुसार, मार्कोचं बजेट 30 कोटी रुपये असून 13 दिवसांत या सिनेमाने 42.15 कोटींचा टप्पा केला आहे. सिनेमाने मल्याळममध्ये 36.67 कोटी रुपये, हिंदीमध्ये 4.33 कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Marco Box Office Collection in 13 Days
या कमाईसह या सिनेमाचा जगभरातील आकडा 45 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. पुष्पा 2 च्या कमाईच्या बाबात बोलायचे झाले तर, मल्याळम भाषेत या सिनेमाने एकूण 14.14 कोटींचा गल्ला जमवला आहे. हनीफ अडेनी दिग्दर्शित सिनेमामध्ये सिद्दीकी, जगदीश, अभिमन्यु एस थिलाकन, कबीर दुहान सिंह, एंसन पॉल आणि युक्ति तरेजा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut । “मुख्यमंत्र्यांनी अनेकांच्या रक्ताचे डाग धुवून त्यांना…”; संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- “… तर Walmik Karad चा एन्काऊंटर होईल”; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
- Chandrashekhar Bawankule | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…