Pushpa 2 । पुष्पा 2 हा सिनेमा जवळपास 500 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box office) चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाने इतर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमात अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun), अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि अभिनेता फहद फासिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
परंतु, एका कोरियन सिनेमाने पुष्पा 2 ला मागे टाकल्याचे पाहायला मिळत आहे. बोगोटा: सिटी ऑफ द लॉस्ट (Bogota: City of the Lost) असे या कोरियन सिनेमाचे नाव आहे. विशेष म्हणजे किम सेओंग-जे (Kim Seong-Jae) दिग्दर्शित हा सिनेमा थिएटरमध्ये काही कामगिरी करू शकला नाही.
31 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या बोगोटा: सिटी ऑफ द लॉस्ट या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. परंतु, हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आणि या सिनेमाने जगभरात नेटफ्लिक्समध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
नेटफ्लिक्सच्या (Netflix) टॉप 10 सिनेमांच्या यादीत हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर आहे. 30 जानेवारी रोजी पुष्पा 2 हा सिनेमा अनेक भाषांमध्ये आणि अतिरिक्त मिनिटांच्या फुटेजसह प्रदर्शित करण्यात आला. पण कोरियन चित्रपटाने पुष्पा 2 ला मागे टाकले आहे.
Netflix Top trending film Bogota: City of the Lost
किम सेओंग-जे दिग्दर्शित बोगोटा: सिटी ऑफ द लॉस्ट या सिनेमामध्ये सॉन्ग जोंग-की, पार्क जी-ह्वान, चो ह्युन-चुल आणि किम जोंग-सू यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा सिनेमा गूक-ही या दक्षिण कोरियन तरुणाच्या जीवनावर आधारित आहे.
महत्त्वाच्या बातम्या :