Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याने राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच आता त्यांना न्यायालयाकडून नोटीस (Notice issues from court) बजावण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना धनंजय मुंडेंनी माहिती लपवल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला होता. धनंजय मुंडेंनी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे (Rajshree Munde) यांच्या तीन मुली आणि करुणा मुंडेंच्या (Karuna Munde) दोन मुलांचा उल्लेख केला होता.
पण करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कोठेही उल्लेख केला नव्हता. यावर करुणा मुंडे यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी करुणा मुंडे यांच्याकडून परळीमधील फौजदारी न्यायालयात ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात अली होती.
त्यानंतर न्यायालयाने आता या तक्रारीची दखल घेतली आहे. परळीच्या फौजदारी न्यायालयाने (Parli Criminal Court) धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायालयाने नोटीस बजावल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावर धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
Court issues notice to Dhananjay Munde
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आरोप करत त्यांना राजीनाम्यासाठी घेरले आहे. मुंडे यांच्या कार्यकाळातील बीड जिल्हा नियोजन समितीमधील निधी वितरणातील अनियमिततेचा प्रश्न समोर आला आहे. अशातच आता त्यांना न्यायालयाने नोटीस बजावल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :