Jitendra Awhad । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) नवी दिल्ली या ठिकाणी सत्कार केल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नवीन वादाला तोंड फुटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अशातच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी माझा सगळ्यात जास्त छळ झाला असल्याचा आरोप केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jitendra Awhad Post on X
जितेंद्र आव्हाड X वर लिहितात, “आदरणीय शरद पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार केला अन् त्यामुळे बराच गदारोळ माजला. आदरणीय पवारसाहेबांचा स्वभाव हा राजकारणातही आदर्शवतच आहे. ते कधीच वैयक्तिक द्वेष, सूड, आसुया मनातही ठेवत नाहीत. राजकीय – वैचारिक वैर ते सोडतही नाहीत. पण, कुणाबरोबर मंच सामाईक करणे त्यांनी आजवर टाळलेलेही नाही,” असा दावा आव्हाड यांनी केला आहे.
“अनेकांबरोबर त्यांचे वैचारिक मतभेद असले तरी वेगवेगळ्या कामांसाठी त्यांनी त्या – त्या माणसांसोबत जुळवून घेतले आणि त्यातून मार्ग काढला आहे. सगळ्याच मंचावर राजकारण मनात ठेवावे, असे मलाही गरजेचे वाटत नाही,” असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
“खरंतर सर्वात जास्त राग मला यायला पाहिजे; कारण, सर्वात जास्त छळ माझाच झाला आहे. निधी मिळत नाही, खोट्या पोलीस केसेस टाकल्या जातात. तरीही, आदरणीय शरद पवार साहेबांकडून सर्वांनीच शिकावे की, सूड, द्वेष आणि आसुया हे राजकारणात असताच कामा नये. आता लाखभर मतांनी जिंकलो असलो तरी हे सरकार आम्हाला निधी काही देणार नाही अन् ज्यांचे डिपॉझिट जाता-जाता वाचले, त्यांचा उदोउदो करून त्यांच्या नावाने निधी पाठवणार,” असेही आव्हाड म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :