Share

Mahadev Munde प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय

by MHD
Appointed of five member team to investigate Mahadev Munde murder case

Mahadev Munde । परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणाला 15 महिन्यांचा कालावधी लोटला असून अजूनही पोलिसांना एकाही आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. यामुळे मुंडे कुटुंबीय आक्रमक झाले आहे.

दोनच दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांना आठ दिवसाचा वेळ दिला असून या दिवसांमध्ये आरोपी अटक झाले नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी स्पष्ट केले.

अशातच आता याप्रकरणी बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. नवनीत कॉवत यांच्याकडून महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा समावेश असेल.

एलसीबीचे पीआय म्हणून काम केलेले संतोष साबळे (Santosh Sable) यांच्यासह चार कॉन्स्टेबल आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा उलगडा करतील. उशिरा का होईना पण पोलिसांनी महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Navneet Kanwats Appointed five member team to investigate Mahadev Munde murder case

एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांवर दबाव वाढत आहे. तर दुसरीकडे महादेव मुंडे प्रकरणी देखील पोलिसांवर दबाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Just two days ago, Dnaneshwari Munde, wife of Mahadev Munde, met Superintendent of Police Navneet Kanwat. In this way, now the police have taken a big decision in this matter.

Maharashtra Crime Marathi News

Join WhatsApp

Join Now
by MHD

Leave a Comment