Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणी सुदर्शन घुले आज करणार मोठा खुलासा? महत्त्वाची माहिती आली समोर

by MHD
Sudarshan Ghule will make big revelation today in Santosh Deshmukh murder case

Santosh Deshmukh । आवादा पवनचक्की प्रकल्पामध्ये दोन कोटींची खंडणी मागितल्याने आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) सहभागी असल्याने सुदर्शन घुलेवर (Sudarshan Ghule) गुन्हा दाखल केला आहे. काल त्याला केज जिल्हा सत्र न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. कारण आज खंडणी प्रकरणात सीआयडी (CID) पोलीस कोठडीत असणाऱ्या सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहे. यामुळे सुदर्शन घुले तपासादरम्यान मोठा खुलासा देखील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुदर्शन घुले याचा खंडणी प्रकरणी सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी सुदर्शन घुले याने कोणाच्या सांगण्यावरून खंडणी मागितली होती? त्याने खंडणीची काही रक्कम घेतली आहे का? यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टीची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Sudarshan Ghule interrogation in Police custody

यामुळे खंडणी प्रकरणातील सत्य बाहेर येऊ शकते. विशेष म्हणजे खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुले यांच्यासह वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि विष्णू चाटे विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या तिघांशिवाय यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास केला जाईल.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजूनही पोलिसांना सापडला नाही. त्याला दोन वेळा फरार घोषित केले तरी तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Today may be an important day in Santosh Deshmukh murder case. Because Sudarshan Ghule is expected to make a big disclosure during the investigation.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment