Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणाला दोन महिने झाले तरी कृष्णा आंधळे फरारच, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

by MHD
Krishna Andhale accused in Santosh Deshmukh murder case

Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या (Santosh Deshmukh murder case) करण्यात आली. यामुळे संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत आहे. दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊनही संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाही.

याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. त्यामुळे पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर सध्या मकोका अंतर्गत कारवाई सुरु आहे.

नुकताच आरोपींचा हत्येदिवशीचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ते गाडी भररस्त्यात सोडून पळून जात आहेत. यातील सर्व आरोपींना अटक केली आहे. पण दोन वेळा फरार घोषित केले तरी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडला नाही.

कृष्णा आंधळे याच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत. संपूर्ण देशभरात स्थानिक गुन्हे शाखा, सीआयडी (CID) आणि एसआयटीकडून (SIT) त्याचा कसून तपास केला जात आहे. परंतु, तो कोणाच्या हाती लागत नाही. यामुळे तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला जात आहे.

Krishna Andhale accused in Santosh Deshmukh murder case

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी स्थानिक नागरिक आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोपीला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला जात आहे. कृष्णा आंधळे सापडत नसल्याने हा संशय आणखी वाढत चालला असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Police failed to catch accused Krishna Andhale in Santosh Deshmukh murder case. The family is accusing the police of supporting the accused.

Marathi News Crime Maharashtra

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment