🕒 1 min read
Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा पोलिसांना गुंगारा देत फरार झाला आहे. अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्यावर आवादा पवनचक्की प्रकल्पामध्ये दोन कोटींची खंडणी मागितल्याने आणि संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी त्याला पाच दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली होती, पण त्याला केवळ दोन दिवसांची कोठडी दिली आहे. खंडणी आणि हत्येप्रकरणी त्याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. तसेच त्याच्या आवाजाचे नमुने देखील तपासले जाणार आहेत आणि तपासानंतर त्याला 14 फेब्रुवारीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याआधी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची चौकशी करण्यात आली आहे. पण सुदर्शन घुले याची याप्रकरणी चौकशी झालीच नव्हते. त्याला सध्या केज शहर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी ठेवण्यात आले आहे. यादरम्यान सुदर्शन घुले यांच्याकडून कोणती नवीन माहिती समोर येतेय का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
Three Day Police custody to Sudarshan Ghule
दरम्यान, सीआयडी आणि एसआयटी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करत आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या इतर साथीदारांवर मकोका लावला असून या हत्याप्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अश्लील विनोदांमुळे दादा कोंडके अडचणीत, Balasaheb Thackeray यांनी पाठिंबा देताच थिएटर हाऊसफुल
- Somnath Suryavanshi च्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा
- इंडियाज गॉट लेटेन्टनंतर नेटकऱ्यांच्या रडारवर BhaDiPa, ‘त्या’ व्हिडिओवरून केली कारवाईची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










