अश्लील विनोदांमुळे दादा कोंडके अडचणीत, Balasaheb Thackeray यांनी पाठिंबा देताच थिएटर हाऊसफुल

by MHD
Balasaheb Thackeray supports Dada Kondke

Balasaheb Thackeray । अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. विशेष म्हणजे दादा कोंडके अभिनेते असण्यासोबत निर्माता आणि दिग्दर्शक देखील होते. अनेकदा त्यांनी अडचणीत आलेल्या बऱ्याच नायिकांना मदत केली होती.

परंतु, दादा कोंडकेंवर एक अशीही वेळ आली होती ज्यामुळे त्यांना त्यांचा सोंगाड्या (Songadya) हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थिएटर मिळत नव्हते. याला कारण म्हणजे त्यांचे अश्लील विनोद. दादा कोंडके हे त्यांच्या चित्रपटांमध्ये अश्लील विनोद करत असल्याचे आरोप होत होते. त्यामुळे त्यांच्या सोंगाड्या या चित्रपटाला थिएटर मिळत नव्हते. (Dada Kondke Movie)

त्यावेळी त्यांच्या मदतीला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धावून गेले होते. बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्या मैत्रीचे किस्से आपण ऐकले असतील. महत्त्वाचे म्हणजे शिवसनेच्या दसरा मेळाव्याला दादा कोंडके यांचे भाषण ठरलेले असायचे.

ज्यावेळी कोंडकेंना थिएटरच मिळत नव्हते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना ‘मराठा मंदिर’ वर राडा करण्‍याचा आदेश दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे दादा कोंडकेंचा सोंगाड्या हा चित्रपट मुंबईत तब्बल 37 आठवडे चालला होता. तसेच हा चित्रपट पुण्यात तब्बल 25 आठवडे चालला होता.

Balasaheb Thackeray Help Dada Kondke

या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या मैत्रीत कधीच फूट पडली नाही. फक्त बाळासाहेब ठाकरेच नाही तर मीनाताई ठाकरे यांच्याशी देखील दादा कोंडके यांची चांगली मैत्री जमली होती. महत्त्वाची बाब म्हणजे दादा कोंडके यांनी त्यांचा कोणताच चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांना दाखवल्याशिवाय सेन्सॉरला पाठवला नव्हता.

Take strict action against BhaDiPa, Ranveer Allahabadia and Samay Raina

दरम्यान, सध्या यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या अश्लील विधानामुळे कॉमेडियन समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेन्ट हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. त्यापाठोपाठ आता सारंग साठ्ये याचा भाडिपा या युट्यूब चॅनलवरील अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो देखील अश्लील विनोद करत असल्याचा ठपका ठेवत अडचणीत आला आहे. प्रखर विरोधामुळे भाडिपाला त्यांचा शो रद्द करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

There was also a time when Dada Kondke could not get a theater to release his film Songadya. Balasaheb Thackeray helped him at that time.

Entertainment Marathi News Politics

Leave a Comment