🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर: राजकारणात शब्दांचे वार कधी वर्मी लागतील सांगता येत नाही, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय. भाजपकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा अक्षरशः ‘पंचनामा’ केला. “बाळासाहेबांनी तुम्हाला घास भरवला नसता, तर तुमचं राजकारण केव्हाच संपलं असतं,” अशा शब्दांत ठाकरेंनी दानवेंना आरसा दाखवला आहे.
“पडले तरी माज गेला नाही…”
उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंचा (Raosaheb Danve) उल्लेख ‘पराभूत खासदार’ असा करत त्यांच्या देहबोलीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “आम्ही तुमच्या ताटात कधीच जेवलेलो नाही. उलट शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दोन घास भरवले नसते, तर तुमचं राजकारण केव्हाच कुपोषणाने संपलं असतं. त्यांनीच तुम्हाला उभं केलं आणि आज तुम्ही त्यांच्याच मुलावर टीका करताय?” निवडणुकीत पराभव होऊनही दानवेंची ‘मस्ती आणि माज’ अजून उतरलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
“आमचं उष्टं-खरकटं का खाताय?”
मध्यंतरी रावसाहेब दानवे यांनी “आमच्याकडे सगळे पक्ष जेवून गेलेत,” असं विधान केलं होतं. या विधानाचा समाचार घेताना ठाकरेंनी थेट वर्मावर घाव घातला. ते कडाडले, “जर तुमच्याकडे सगळे जेवून गेले, तर मग आज तुम्ही आमच्या ताटातलं उष्टं-खरकटं का खाताय? स्वतःच्या ताकदीवर तुमचं पोट का भरत नाही?” फोडाफोडीचं राजकारण करून पक्ष वाढवणाऱ्या भाजपला ‘इतकं खाऊनही तुमची भूक का भागत नाही?’ असा जाब ठाकरेंनी विचारला आहे.
उद्धव ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठवाड्यात शिवसेना (UBT) विरुद्ध भाजप असा सामना आता अधिकच रंगणार असल्याचे चित्र आहे. दानवे आता या ‘कुपोषण’ टीकेला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “निवडणुकीत पडलात, तरी माज जाईना”; ठाकरेंनी दानवेंची ‘ती’ गोष्ट काढली, सभेत शिट्ट्यांचा पाऊस!
- ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
- १५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











