Share

“हिंदुहृदयसम्राट एकच!” शिर्डीत उद्धव ठाकरेंचा शाह-शिंदेंवर हल्लाबोल

शिर्डीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा उल्लेख करत भाजप, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

Published On: 

Uddhav Thackeray

शिर्डी : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिर्डीतील ‘निष्ठेची वज्रमूठ’ मेळाव्यात भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाषणादरम्यान त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचा उल्लेख ‘शाहसेना’ असा करत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक खासदार आणि आमदार फोडूनही ठाकरे संपत नाहीत, हा प्रश्न विरोधकांना पडला आहे. उद्धव ठाकरे ही केवळ व्यक्ती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी आणि हिंदूच्या मनात आजही जिवंत आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले की, ‘हिंदुहृदयसम्राट’ ही ओळख केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. त्यांची जागा दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. कोणीही स्वतःला त्या पदवीसाठी पात्र ठरवू शकत नाही. लोकांना खरे आणि बोगस यातील फरक ओळखता येतो, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवरही टीका केली आहे. हा केवळ पक्ष फोडण्याचा प्रयत्न नव्हता, तर शिवसेनेचे रूपांतर ‘शाहसेना’मध्ये करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न आहे. ही संपूर्ण राजकीय रणनीती आहे, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी देशातील विरोधी पक्षांचाही उल्लेख केला. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि शिवसेना यांसारख्या पक्षांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीभोवती हुकूमशाहीचा पोलादी पाश आवळण्याचे कारस्थान सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

सभेच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी 2029 मध्ये महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. शिर्डीतील या आक्रमक भाषणामुळे राज्यातील ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे असा राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही