Mumbai Indians । येत्या 21 मार्चपासून आयपीएलचे (IPL 2025) सामने सुरु होणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. सर्व नवीन खेळाडूंवर त्या त्या संघांचे विशेष लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असणार आहे. परंतु, त्याच्यावर पहिल्या सामन्यात बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पहिल्या सामन्यात हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करू शकतो. अशातच आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. करोडोंची बोली लावलेला खेळाडू या सामन्यांना मुकणार आहे.
अफगाणिस्तानचा 18 वर्षीय युवा ऑफ स्पिनर अल्लाह गजनफर हा दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याने आतापर्यंत 11 वनडे सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. पण आता झिम्बाब्वे दौर्यावर असताना त्याला दुखापत झाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसोबत पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएलमध्येही त्याला खेळता येणार नाही. मुंबई इंडियन्सने 4.80 कोटी देऊन त्याला खरेदी केले होते. गजनफरला संघात सामील केल्यानंतर संघाला ट्रॉफी जिंकण्याची आशा होती. पण आता संघाला मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाचे म्हणजे गजनफरने अद्यापही आयपीएलमध्ये पदार्पण केले नव्हते. तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार होता. परंतु आता त्याला दुखापत झाल्याने त्याला यंदाही आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे आता त्याच्या जागी मुंबई इंडियन्स कोणाला संधी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
दरम्यान, गझनफरने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन-डे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. तीन सामन्यांमध्ये त्याने एकूण ९ विकेट घेतल्या होत्या. ती मालिका ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली होती. इतकेच नाही तर गझफरने इमर्जिंग आशिया कपमध्ये भारताविरूद्ध देखील चांगली कामगिरी केली होती.
Mumbai Indians squad for IPL 2025
हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ट्रेंट बोल्ट, तिलक वर्मा, दीपक चहर, विल जॅक्स, नमन धीर, मिचेल सँटवर, रायन रिक्लेटन, लिझार्ड विल्यम्स, रिसी टॉपले, रॉबिन मिंझ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॉन जेकब्स, वेंकट सत्यनारायण, राज अंगद बव्वा, श्रीजित कृष्णन, अश्वनी कुमार.
महत्त्वाच्या बातम्या :