Amol Kolhe । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्कार केला. इतकेच नाही तर पवारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे तोंडभरून कौतुक देखील केले. परंतु, यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
“हा एकनाथ शिंदे यांचा सत्कार नाही तर त्यांनी अमित शाह (Amit Shah) यांचा सत्कार केला आहे, असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शहांचा सत्कार आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी राऊत यांना उत्तर दिले आहे. (Amol Kolhe vs Sanjay Raut)
“हे उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखे आहे. पवारसाहेबांच्या राजकारणाविषयी बोलण्याची फार कमी जणांची उंची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटते की राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा जपला पाहिजे,” असा सल्ला कोल्हे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
“मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होत असताना फक्त एकनाथ शिंदे नाही तर 14 ते 15 जणांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये होता. कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जात सांस्कृतिक गोष्टी पाहायला पाहिजेत,” असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.
Amol Kolhe on Sanjay Raut
पुढे ते म्हणाले की, “जर राऊतसाहेबांना इतके दु:ख झाले असेल, तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील उल्लेख केला. उद्धव ठाकरे देखील अजित पवारांना भेटले. आपण याला स्टेटसमनशिप म्हणून पाहुयात आणि जर प्रत्येकवेळी राजकारण आणले तर अवघड होईल,” असे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :