Dhananjay Munde यांच्या अडचणी वाढल्या? अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय

On one hand, the opposition has surrounded Dhananjay Munde for his resignation, on the other hand, it is being said that Munde’s problems have increased due to Ajit Pawar decision.

by MHD

Published On: 

Ajit Pawar big decision on corruption charges against Dhananjay Munde

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडे पालकमंत्रीपदावर असताना जिल्हा वार्षिक योजना 2021-22अंतर्गत परळी आणि आंबेजोगाईमध्ये कामे न करताच सुमारे 37 कोटीची 70 लाख रुपये काम न करता बिले उचलली. सार्वजनिक बांधकाम विभागात नऊ कामाचे 13 कोटी रुपयांची बिले दिली, असा आरोप सुरेश धस यांनी केला होता.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवारांनी मागील दोन वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये शाळा आणि अंगणवाड्यांना साहित्य पुरविण्याच्या कामात मोठी अनियमितता समोर आली आहे.

Dhananjay Munde problems increased due to Ajit Pawar decision

याबाबत अजित पवार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलावले आहे. एकीकडे विरोधकांनी धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासाठी घेरले आहे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या या निर्णयामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही