Share

Chhagan Bhujbal यांचे संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “हिमालयात खूप….”

by MHD
BJP Tushar Bhosale criticized Chhagan Bhujbal about his statement himalaya saint

Chhagan Bhujbal । सत्तेत येऊनही महायुतीमध्ये अजूनही धुसफूस असल्याचे समोर येत आहे. विविध कारणांवरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु होत्या.

महत्त्वाचे म्हणजे अनेकदा त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. अनेकदा ते अजित पवार गट सोडून शरद पवार गट किंवा भाजपमध्ये (BJP) पक्षप्रवेश असल्याच्या चर्चा देखील सुरु होत्या. त्यामुळे भुजबळ हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

“हिमालयात संत महात्मा खूप आहेत. त्यांचा मला काही उपयोग आहे का? त्यांनी सगळी विद्या आपल्यापुरती ठेवली. पुढच्या व्यक्तींना ती विद्या शिकवली नसल्याने त्याचा ऱ्हास होत आहे,” असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यामुळे नवा वाद पेटला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी समाचार घेतला आहे.

BJP Tushar Bhosale criticized Chhagan Bhujbal

“काही साधू-संत समाजात राहून कार्य करतात. तर काही हिमालयात जाऊन तपश्चर्या, साधना करतात. पण छगन भुजबळ यांच्यासारखे समाजाच्या जीवावर स्वतःचे घर भरत नाहीत किंवा समाजाचा उपयोग स्वतःच्या मुलाला, पुतण्याला आमदार-खासदार करण्यासाठी करत नाहीत. तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केली आहे,” अशी टीका भोसले यांनी केली आहे. (Tushar Bhosale vs Chhagan Bhujbal)

Web Titel – BJP Tushar Bhosale criticized Chhagan Bhujbal about his statement himalaya saint 

महत्त्वाच्या बातम्या :

BJP Tushar Bhosale criticized Chhagan Bhujbal about his statement himalaya saint

Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now