“जरांगेंना बाजूला करून मराठा समाजामध्ये फूट पाडायची”; Jitendra Awhad यांची सुरेश धसांवर टीका

Jitendra Awhad हे मराठा समाजामध्ये फूट पाडत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.

by MHD

Published On: 

Jitendra Awhad criticizes Suresh Dhas on Maratha reservation

Jitendra Awhad । राजकीय वर्तुळात सध्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध भाजपचे आमदार सुरेश धस (Jitendra Awhad vs Suresh Dhas) असा संघर्ष पाहायला मिळत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर विविध विषयांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वातावरण देखील तापल्याचे पाहायला मिळत आहे.

जितेंद्र आव्हाड हे मराठा समाजामध्ये फूट पाडत असल्याचा आरोप सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता. यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. “यांच्या सरकारसमोर लाखो मराठा समाजाचे मोर्चे निघाले, तेव्हा यांनी या समाजाला न्याय दिला का? सरकारला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना बाजूला करून कोणाला तरी मोठं करायचं आहे. जरांगेंना बाजूला करून मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे,” असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

“मी कुठेही अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे गुणगाण गायले नाही. जर तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा होईल. त्याला चार फुटावरून गोळी घालणे योग्य नाही. आम्ही म्हणत नाही खून झाला आहे पण न्यायाधीशांनी हा एन्काऊंटर नाही असे सांगितले. शाळेतले सीसीटीव्ही कुठे गायब झाले?” असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

Jitendra Awhad on Suresh Dhas

पुढे ते म्हणाले की, “तुम्ही मला मीडियाची स्पेस सांगता, पण तुम्हाला जेव्हा मीडियाचा एम माहित नव्हता तेव्हापासून मीडियामध्ये आहे. मला टीव्हीबद्दल काही सांगू नका. मी कुठेही बाईचं नाव घेऊन, काही तरी वैयक्तिक प्रकरणं काढून बोलत नाही. मला ते अजिबात आवडत नाही. माझा प्रामाणिक मुद्दा असतो,” असाही दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही