Ajit Pawar । मागील काही दिवसांपासून महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. याला कारण आहे पालकमंत्रीपद. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये अजूनही काही जागांचा तिढा सुटला नाही. याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या डीपीडीसीच्या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांशिवाय बैठक घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महायुतीमध्ये अजूनही धुसफूस सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.
रायगड जिल्ह्याच्या मुद्यावरून अजित पवारांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) या उपस्थित होत्या. पण शिंदे गटाचे रायगडमधील आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle), महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) आणि महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी पाठ फिरवली.
विशेष म्हणजे आता या आमदारांनी आपल्याला या बैठकीची माहिती दिली नसल्याचा दावा केला आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कामे, त्यासाठीचा निधी, खर्चांचे नियोजन या बैठकीत झाले. पण या बैठकीलाच शिंदे गटाने पाठ फिरवली.
Shinde group MLA absence in DPDC meeting in Raigad
दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या काही योजनांनादेखील ब्रेक लागणार असल्याची माहिती सुरु आहे. अशातच शिंदे गटाच्या आमदारांनी डीपीडीसीच्या बैठकीला दांडी मारल्याने महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :