Share

Suresh Dhas यांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा, म्हणाले; “त्यांना फक्त रॉकेल टाकण्याचे…”

by MHD
Suresh Dhas criticizes Jitendra Awhad on Somnath Suryavanshi death case

Suresh Dhas । सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढला होता. परंतु, भाजप आमदार सुरेश धस यांनी तो नाशिक येथेच मध्यस्थी करून थांबवला. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत.

सुरेश धस यांच्यावर भीम आर्मीसह विरोधक देखील झाले आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धस यांचा एक व्हिडिओ शेअर करत धस यांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप केला होता. यावरून धस यांनी पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

“इतर कोणी सूर्यवंशी कुटुंबियांचे सांत्वन केले की नाही हे मला माहिती नाही. पण मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चे मिटवणे योग्य की अयोग्य? जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याचं समजतं का? राज्यातले सामाजिक स्वास्थ्य चांगले राहिले पाहिजे. लॉंग मार्च नाशिक येथे थांबल्याने आव्हाड यांना पोटसूळ सुटला आहे का?” असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला.

Suresh Dhas on Jitendra Awhad

“मी सर्व मोर्चात सूर्यवंशी कुटुंबीयांची बाजू मांडली आहे. माझी दुटप्पी भूमिका नसून एकच टप्पी भूमिका आहे. आंदोलन थांबवा, मागण्या पूर्ण करू अशी विनंती आम्ही आंदोलकांना करत होतो. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी सुरुवातीपासून मागणी आहे. परभणी प्रकरणावरून आव्हाड यांनी मोर्चा काढावा,” असे आव्हान धस यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

जितेंद्र आव्हाड यांनी Suresh Dhas यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप केला होता. यावरून धस यांनी पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD