Share

IPL 2025 बद्दल मोठी अपडेट आली समोर, ‘या’ ठिकाणी होणार फायनल

IPL 2025 बाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पहिला सामना कोण खेळेल हे लवकरच स्पष्ट होईल. 

by MHD

Published On: 

IPL 2025 final will be held at eden garden

🕒 1 min read

IPL 2025 । 21 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या (IPL) 18 व्या पर्वाची सर्वांना उत्सुकता आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सर्वच संघांमध्ये मोठे बदल पाहायला दिसतील. यंदाची आयपीएलची ट्रॉफी कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशातच आता आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयपीएलचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होऊ शकते (Indian Premier League 2025 schedule). त्यामुळे गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पहिला सामना कोण खेळेल हे लवकरच स्पष्ट होईल.

IPL 2025 final will be held at Eden Garden

महत्त्वाची बाब म्हणजे आयपीएलचा पहिला सामना ईडन गार्डनवर (Eden Garden) खेळवला जाईल, तसेच फायनलही याच मैदानावर होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर प्ले ऑफ 2 चा सामनादेखील कोलकाता येथेच होण्याची शक्यता आहे. प्ले ऑफ 1 आणि एलिमिनेटरचे सामने सनरायझर्स हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

यंदा आयपीएलमध्ये समाविष्ट झालेले 10 संघ 11 विविध शहरांमध्ये एकूण 74  सामने खेळतील. राजस्थान रॉयल्सचे दोन होम सामने आसामच्या बर्सापारा क्रिकेट स्टेडियमवर इतर सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होतील. दिल्ली कॅपिटल्सचे सर्व सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

IPL 2025 Venues | Tata IPL 2025 Teams Home Ground 

शहर स्टेडियम होम टीम
मुंबई वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्स (MI)
चेन्नई एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई सुपर किंग्स (CSK)
कोलकाता ईडन गार्डन्स कोलकाता नाइट रायडर्स (KKR)
दिल्ली अरुण जेटली स्टेडियम दिल्ली कॅपिटल्स (DC)
बेंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सनरायझर्स हैदराबाद (SRH)
अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात टायटन्स
जयपूर सवाई मानसिंग स्टेडियम राजस्थान रॉयल्स (RR)
मोहाली पीसीए स्टेडियम पंजाब किंग्स (PBKS)
लखनौ एकना क्रिकेट स्टेडियम लखनौ सुपर जायंट्स (LSG)

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)