Santosh Deshmukh प्रकरणात हाती लागला मोठा पुरावा, ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आली महत्त्वाची नावे

Santosh Deshmukh यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे तपासाला आणखी गती मिळू शकते.

by MHD

Published On: 

Santosh Deshmukh Murder Case Police seized important CCTV footage

Santosh Deshmukh । 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने (Santosh Deshmukh murder case) संपूर्ण राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या हत्याप्रकरणाने बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दोन महिने उलटूनही त्यांना न्याय मिळाला नाही.

अशातच आता पोलिसांच्या हाती हत्येदिवशीचे महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज (Santosh Deshmukh Murder Case CCTV Footage) लागले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज 18 सेकंदाचे आहेत. यामध्ये हत्या प्रकरणातील आरोपी त्यांची स्कॉर्पिओसोडून रस्त्याने पळून जाताना दिसत आहेत. या नवीन सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे हे आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून पळाले होते. वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांना मिळाले आहे.

CCTV Footage of Santosh Deshmukh Murder Case

विशेष बाब म्हणजे संतोष देशमुख यांचे मारेकरी भर रस्त्यात गाडी लावून पळून गेले होते आणि यावेळी अगदी काही अंतरावर पोलीस होते. त्यांना सहज या आरोपींना पकडता आले असते. पण पोलिसांनी त्याचा पाठलाग केला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
byMHD

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही