Share

Rahul Solapurkar यांचा पाय खोलात! ‘त्या’ वक्तव्यावरून पुण्यात तक्रार दाखल, अटकही होणार?

by MHD
Rahul Solapurkar complaint against in Pune for making statements about Dr Babasaheb Ambedkar

Rahul Solapurkar । ज्येष्ठ अभिनेते आणि व्याख्याते राहुल सोलापूरकर मागील काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सर्वस्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याला कारण आहे त्यांची वादग्रस्त वक्तव्य (Rahul Solapurkar controversial statement). आता याच वक्तव्यावरून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

त्यांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच त्यांना तातडीने अटक करुन त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून तक्रारीत करण्यात आली आहे.

सोलापूरकर यांनी या दोन्ही महापुरुषांबाबत चुकीचे संदर्भ दिलेअसल्याने संभाजी ब्रिगेडने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. संभाजी ब्रिगेडने तक्रार देऊनही यासंदर्भात पोलिसांनी पुढील कार्यवाही केली नाही. त्यामुळे सोलापूरकर यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Complaint Against Rahul Solapurkar in Pune

दरम्यान, राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यात वादळ उठले होते. त्यानंतर त्यांनी वक्तव्यावरून माफी मागितली. परंतु, पुन्हा याच पॉडकास्टमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

संभाजी ब्रिगेडने Rahul Solapurkar यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोलापूरकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Maharashtra Entertainment Marathi News

Join WhatsApp

Join Now