🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी – अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी “हल्लेखोर दीपक काटेचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट आणि आक्रमक इशारा दिला आहे.
आखरे म्हणाले, “संभाजी ब्रिगेडला जर वेळेत न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनांचा भडका उडेल. विचारधारेच्या लढाईसाठी आम्ही तयार आहोत. पण जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही.”
Sambhaji Brigade warns of revenge
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला एखाद्या योजनाबद्ध षडयंत्राचा भाग असल्याचा संशयही आखरे यांनी व्यक्त केला. “शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) ही गेल्या २८ वर्षांपासून महाराष्ट्रात वैचारिक परिवर्तन घडवते आहे. नुकतेच ‘अर्बन नक्षलवादी विधेयक’ पारित झाले, आणि लगेचच आमच्यावर पहिली कारवाई घडवली जाते? हा केवळ योगायोग असू शकत नाही,” असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला.
भाजपने “या हल्ल्यात आमचा संबंध नाही” असे सांगून हात झटकले, तरीही आखरे यांनी भाजपवर ताशेरे ओढले. “जर भाजपचा संबंध नाही, तर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना पक्षातील पदं का दिली जातात? ‘पार्टी विथ डिफरन्स’ ही गुंड पोसण्यासाठी आहे का?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
आखरे यांनी आठवण करून दिलं की, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली तेव्हा गुन्हे दाखल करण्यात आले. “इथे मात्र, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, तरी प्रशासन गप्प आहे. हे आम्ही सहन करणार नाही. शासनाने तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आम्हीच त्या काट्याचा काटा काढू,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
संघटनेच्या नावात बदल करण्याची चर्चा फेटाळून लावत आखरे म्हणाले, “‘संभाजी’ हा शब्द आमच्या हृदयात आहे. त्यात बदल होणार नाही. कोणालाही तो बदलायचा अधिकार नाही. कोणतीही ताकद आमचं नाव बदलू शकत नाही.” प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला केवळ एका व्यक्तीवरचा नाही, तर तो एक विचारदहन आहे, अशी भूमिका आखरे यांनी मांडली.
📌 महत्वाच्या बातम्या
- AI Revenge Porn : प्रियकराने AI वापरून गर्लफ्रेंडची बदनामी केली, १० लाख कमावले
- प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण: विधानसभेत पडसाद, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची माहिती
- माझ्या हत्येचा कट भाजपने रचला होता, फडणवीस सरकार जबाबदार! – प्रवीण गायकवाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











