Share

प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण: विधानसभेत पडसाद, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची माहिती

Pravin Gaikwad attack fallout in Maharashtra Assembly

Published On: 

Pravin Gaikwad attack fallout in Assembly; devendra fadnvis provides action details.

सोलापूर/मुंबई: संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड ( Pravin Gaikwad Attack ) यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याची आज महाराष्ट्र विधानसभेत तीव्र चर्चा झाली. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित करत, गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा दावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात कारवाईची सविस्तर माहिती सभागृहात दिली.

गायकवाड रविवारी अक्कलकोटमध्ये एका सत्कार समारंभासाठी गेले असताना, शिवधर्म फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली आणि धक्काबुक्की केली. गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना बाहेर खेचून मारहाण करण्यात आल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

Pravin Gaikwad Attack Echoes in Maharashtra Assembly

विधानसभेत (Maharashtra Assembly) यावर चर्चा करताना वडेट्टीवार म्हणाले, “ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही, तर महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेला दिलेला आव्हान आहे. गायकवाड यांचे केवळ ‘संभाजी’ हे नाव असल्यानेच त्यांच्यावर हल्ला झाला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी स्पष्ट केले की, “हल्लेखोरांनी ‘संभाजी’ नावावर आक्षेप घेतला. आरोपींनी ‘संभाजी’ नाव का ठेवले, ‘छत्रपती संभाजी’ का नाही, असा वाद घालत त्यांच्यावर शाईफेक केली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गायकवाडांना ( Pravin Gaikwad Attack ) फिर्याद देण्याची विनंती केली. ते सुरुवातीला तयार नसले तरी पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून, त्यांना अजूनही सोडण्यात आलेले नाही. या प्रकरणात गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

वडेट्टीवार यांनी हल्लेखोराच्या पार्श्वभूमीबाबत गंभीर आरोप केले. “”ज्याने हे कृत्य केले, त्याचा उद्देश काय होता? या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत, तसेच सख्ख्या चुलत भावाची हत्या केल्याप्रकरणी तो तुरुंगात होता.

प्रवीण गायकवाड यांना गाडीतून ओढून बाहेर काढणे, काळे फासणे, कॉलर धरून खाली पाडणे आणि नंतर त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे, हे सगळे पूर्वनियोजित होते. त्यांना काळे फासण्याचे काहीही कारण नव्हते,” असे वडेट्टीवार म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही