Share

प्रसिद्ध युट्युबर Ranveer Allahabadia वर ‘त्या’ वक्तव्यामुळे होणार कारवाई? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले..

by MHD
Devendra Fadnavis reacted on Ranveer Allahabadia statement

Ranveer Allahabadia । प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादिया अडचणीत आला आहे. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या शोच्या एका एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून रणवीर अलाहाबादिया याने हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने एक वक्तव्य (Ranveer Allahabadia controversial statement) केले होते.

त्याच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्याने शोमध्ये बोलताना आई-वडिलांबाबत अश्लील वक्तव्य केले होते (Ranveer Allahabadia statement India’s Got Latent). त्यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी वकील आशिष राय आणि इतरांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

तसेच त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी केली आहे. दरम्यान, यापूर्वीही या शोविरोधात तक्रार दाखल केली आहे. अशातच आता रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर हा शो पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on Ranveer Allahabadia

“मला याबद्दल माहिती मिळाली असून मी तो शो पाहिला नाही. शोमध्ये अपमानास्पद आणि अश्लील गोष्टी बोलणे चुकीचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करतो, त्यावेळी आपले स्वातंत्र्य संपते. प्रत्येकाच्या मर्यादा असून आम्ही अश्लीलतेसाठीही नियम ठरवले आहेत. जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे अलाहाबादिया याच्या अडचणी वाढल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

Ranveer Allahabadia याच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील वक्तव्यामुळे वकील आशिष राय आणि इतरांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.

Maharashtra Crime Marathi News Politics