Suresh Dhas । मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असल्याचे दिसत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून (Santosh Deshmukh murder case) बीड जिल्हा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. देशमुखांच्या हत्येला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी त्यांना न्याय मिळाला नाही. यावरून सातत्याने विरोधक सरकारला घेरत आहेत.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने ते मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तसेच मराठा उपोषणादरम्यानही त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी चर्चा केली होती. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे X वर लिहितात, “आ.धस यांच्यासारख्या शाब्दिक फुलोरा मनोज जरांगे यांना फुलवता येत नसेल मात्र मराठा समुदायासाठी त्यांनी निष्कपटपणे काम केले हे सत्य आहे. परंतु देशमुख हत्या प्रकरणानंतर जरांगेंना रिप्लेस करून सुरेश धस यांना मराठा मॅन म्हणून प्रस्थापित करण्यात भाजपा यशस्वी झाली आहे,” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Sushma Andhare criticize BJP
सुषमा अंधारे यांच्या टीकेनंतर भाजप (BJP), सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दरम्यान, काल सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला होता. पण हा लॉंग मार्च सुरेश धस यांनी मध्यस्थी करून थांबवला, यावरून देखील विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :