Vivo V50 । भारतात Vivo च्या स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. मागणी जास्त असल्याने कंपनी सतत शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच आता भारतात लवकरच Vivo V50 लाँच (Vivo V50 launch) करणार आहे. यात तुम्हाला उत्तम स्पेसिफिकेशन पाहायला मिळेल.
नुकताच कंपनीने याचा टीझर लाँच केला आहे. यावरून हा स्मार्टफोन अल्ट्रा स्लिम बॉडी आणि क्वाड वक्र स्क्रीनसह येईल, असे स्पष्ट होत आहे. (Vivo V50 launch in India) कंपनी 17 फेब्रुवारी रोजी विवो व्ही 50 लाँच करणार असून फोनच्या किंमतीबद्दल (Vivo V50 Price) जास्त माहिती नाही. पण कंपनी प्रीमियम मिड रेंजमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्मार्टफोनची रचना मागील वर्षाच्या व्ही-मालिकेच्या फोनसारखेच असणार आहे.
जाणून घ्या खासियत
मागील V40 सीरिजप्रमाणे V50 मध्ये पेपर थिन डिझाइन पाहायला मिळेल. 6,000mAh बॅटरी रेंजमधील हा देशातील सर्वांत स्लिम स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. चार्जिंगचा स्पीड कमीत कमी 80W असण्याची शक्यता आहे.
हे लक्षात घ्या की विवोचा V50 हा फोन रेड रोज, स्टेरी नाईट, टायटॅनियम ग्रे अशा तीन रंगांमध्ये लाँच होणार आहे. तसेच कोर डिझाईन V40 वर आधारित असून समोरील बाजूस, V50 41 डिग्री गोल्डन कर्वेचरसह क्वाड-वक्र डिस्प्लेवर स्विच करते.
Vivo V50 Features
याच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप फोनमध्ये पाहायला मिळेल. त्याला 50 एमपी + 50MP चा ड्युअल रीअर कॅमेरा मिळेल. तसेच कंपनी 50 एमपी सेल्फी कॅमेरा देईल. हा फोन आयपी 68 आणि आयपी 69 रेटिंगसह येईल. लीक अहवालांनुसार, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जनरल 3 प्रोसेसर यात मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या :