Sanjay Raut । दिल्ली विधानसभेच्या निकालांमध्ये काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) दारुण पराभव झाला. यामुळे या दोन्ही पक्षांना विरोधकांसह इंडिया आघाडीतील पक्षांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. “उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आपच्या पराभवानंतर चिंता व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीत रहायचे की नाही यावर पक्षाच्या इतर नेत्यांशी बोलून एकत्र काम करायचे का नाही याचा विचार करावा लागेल असे ठाकरे यांनी आपल्याशी चर्चा करताना म्हटले आहेत,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. जर ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर याचा फटका येणाऱ्या काळात शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गट यांना होतोय का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
विशेष म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र्रात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. लोकसभेत घवघवीत यश मिळूनही त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला नाही. जर हे पक्ष येत्या काळात एकमेकांविरोधात लढली तर त्यांचे किमान आमदार निवडून येतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबत सुनील तटकरेंचे मोठं विधान, म्हणाले; “पक्षाच्या हिताचा विचार…”
- Kalicharan Maharaj यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले; “हिंदूंनी त्यांची मुंडके छाटून त्याची माळ..”
- ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबद्दल शब्द दिला होता? Devendra Fadnavis यांनी केला मोठा खुलासा