Devendra Fadnavis । 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची (BJP) युती तुटली होती. त्यावेळी झालेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा वादावरून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा करत बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली होती, हे स्पष्ट केले आहे.
“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माझ्याकडे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते. पण अमित शाह (Amit Shah) यांनी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दिला होता. याउलट मीच त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती,” असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
“मी, आदित्य आणि रश्मी वहिनी बाहेर बसलो होतो, त्यावेळी उद्धव ठाकरे हे अमित शाह यांना भेटण्यासाठी आत गेले. बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये कोणी आणि काय बोलायचे ते ठरले. ज्याप्रमाणे ठरले होते तसे मी बोललो. पण आम्ही सरकार बनवू शकतो हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रंग बदलला,” असा आरोप फडणवीसांनी केला.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
“निवडणुकीचा निकाल लागल्यावर त्यांनी फोन करून काय करायचं आणि काय नाही हे ठरवलं असतं. पण पुन्हा त्यांनी माझा फोन घेतला नाही. निकाल लागताच त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेणे टाळले आणि आधी एकट्यानेच पत्रकार परिषद घेत आम्हाला सगळे पर्याय खुले असल्याचे सांगितले. जर त्यावेळी मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरलं असेल, तर त्याची किमान चर्चा तरी त्यांनी केली असती. त्यांना शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जायचं होते हे निवडणुकीपूर्वीच ठरले होते,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :