Diabetes । अनेकांना असे वाटते की, मधुमेह हा जास्त साखर खाल्ली तर होतो. पण हा प्रत्यक्षात एक भ्रम असून मधुमेह होण्यामागचे मागचे खरे कारण काही वेगळेच आहे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना इतर आजारांसोबतही संघर्ष करावा लागतो. (Health tips)
कारण मधुमेहामुळे हृदयरोग (Heart disease), स्ट्रोक, मूत्रपिंड रोग यासारखे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही काही पदार्थ खाल्ले तर तुमच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कोणते आहेत हे पदार्थ? जाणून घेऊयात.
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetic patients) मिठाई, केक, कुकीज आणि इतर गोड पदार्थ सेवन आरोग्यासाठी सर्वात हानिकारक मानले जाते. कारण या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असते. या पदार्थाचे सेवन केले तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स यांसारख्या पदार्थ देखील रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात.
- त्याशिवाय समोसा, फ्रेंच फ्राईज आणि बर्गर यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त कॅलरी आणि चरबी असते. त्यांच्या सेवनाने साखर वाढते. शरीरातील वजनही वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाची समस्या वाढते. त्यामुळे रुग्णांनी अशा पदार्थांपासून दूर राहावे.
Tips for diabetic patients
- चिप्स, कुरकुरीत आणि इतर प्रक्रिया केलेले पॅकबंद पदार्थामुळे रक्तातील साखर वाढू शकते. इतकेच नाही तर पॅक केलेल्या फळांच्या रसातही साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यांच्या सेवनाने रक्तातील साखर वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या
महत्त्वाच्या बातम्या :