Kidney । किडनी हा आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. किडनी रक्तातून विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करत असते. किडनीच्या आरोग्याची (Kidney health) काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हल्ली किडनी निकामी (Kidney failure) होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Health tips)
जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर मग किडनीचे आजार (Kidney disease) होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे किडनी निकामी होण्याची लक्षणे शक्य तितक्या लवकर ओळखली जाणे आवश्यक आहे. जेणेकरून परिणाम टाळता येतील. जाणून घेऊयात लक्षणे.
Kidney failure symptoms
पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे
ज्यावेळी किडनी शरीरात उपस्थित अतिरिक्त पाणी काढून टाकू शकत नाही, तेव्हा ते शरीरात जमा होते. तेव्हा पाय आणि डोळ्याभोवती सूज येते.
लघवीचा गडद रंग
गडद, तपकिरी लघवी देखील धोक्याचे लक्षण असू शकते. याचा अर्थ असा आहे की किडनीच्या तुम्हाला गंभीर समस्या आहेत.
रात्री वारंवार लघवी होणे
वारंवार लघवी होणे सामान्यत: मधुमेहाचे लक्षण मानले जाते. तसेच रात्री अधूनमधून लघवी होणे सामान्य बाब आहे. पण जर ते पुन्हा पुन्हा होत राहिले तर ते किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.
सतत उलट्या होणे
किडनी निकामी होणे हे रक्तातील विषाची पातळी वाढवू शकते. असे झाले तर विनाकारण उलट्या होऊ शकतात.
लघवीतून रक्त येणे
लघवीतून रक्त येणे हे कोणत्याही परिस्थितीत सामान्य नाही. त्वरित त्याची तपासणी केली पाहिजे. कारण यामुळे संसर्ग, किडनी स्टोन किंवा किडनीचा आजार देखील सूचित होऊ शकतो.
Tips for healthy Kidney
उपाय
जर तुम्हालाही अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही तातडीने तुमच्या नजीकच्या डॉक्टरांकडून उपचार घ्या. जर तुम्ही उपचार घेणे टाळले तर त्याचा सर्वात मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या
महत्त्वाच्या बातम्या :