🕒 1 min read
Manikrao Kokate । राज्यातल्या महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेमध्ये (Crop Insurance) मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. अशातच आता पीक विम्यासंदर्भात राज्यकृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
“राज्य सरकार एक रुपयात देत असलेल्या पीक विम्याचा काही लोकांनी केला गैरवापर केला. पीक विमा योजना यशस्वी व्हावी, योग्य त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. सरकारला या योजनेबाबत चांगले-वाईट अनुभव आले आहेत. पीक विम्याच्या कंपन्या लुटमार करतात. सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही,” असे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
“सरकारला पीक विमा योजनेत सुधारणा करायची आहे. या योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला,” असे वादग्रस्त वक्तव्य कोकाटे यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “बाकीच्या राज्यातील लोकांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोफावले आणि त्यातून असे वाटत आहे की पीक विमा खूपच चांगली योजना आहे की काय? पण प्रत्यक्ष चौकशी केल्यावर आम्हाला समजले की आम्ही 4 लाख अर्ज नामंजूर केले आहे. या योजनेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल,” असे म्हणत योजनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेतही कोकाटे यांनी दिले आहेत.
Manikrao Kokate on Crop Insurance
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी यांनी पीक विमा योजनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो. विरोधक त्यांना याच मुद्द्यांवरून घेरू शकतात. या वक्तव्यामुळे कोकाटे यांच्या अडचणी वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Karuna Munde यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले; धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा?
- “वाल्मिक कराडची बी टीम आम्हाला धमकावतेय”; Dhananjay Deshmukh यांचा खळबळजनक आरोप
- “एकनाथ शिंदे हा खोटारडा…”; Sanjay Raut भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











