Dhananjay Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरीदेखील देशमुखांना न्याय मिळाला नाही. अशातच त्यांचे बंधू धनंजय देशमुखांनी मोठा खुलासा केला आहे.
“वाल्मिक कराड (Walmik Karad) याची बी टीम सक्रिय आहे. या टीममध्ये बालाजी तांदळे (Balaji Tandale), संजय केदार, डॉ. वायबसे आणि मोराळे अशा चार जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आम्हाला धमकावलं जात असून त्यांच्यावर कारवाई कधी करणार? असा संतप्त सवाल धनंजय देशमुख यांनी विचारला आहे.
“बी टीममधील चार नावे स्पष्ट आहेत. जे आरोपीला सोडायला गेले होते. भावाच्या पाठीमागं जी गाडी होती, तीच घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे, 6 तारखेला, 9 तारखेला शेजारच्या गावचे संरपंच संजय केदार त्यांना आरोपींचा फोन आला होता,” असा दावा देखील धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
“बी टीममधील लोकांनी आरोपींना कधी पैशाच्या स्वरुपात, कधी गाडीच्या स्वरुपात तर कधी साहित्य पुरवण्याच्या स्वरुपात मदत केली आहे. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना विचारले तर त्यांनी असे सांगितले की, आम्ही पुरावे तपासले तर त्या लोकांचा सहभाग नाही,” असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “बालाजी तांदळे कुणासाठी काम करतो, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. जर मंत्री धनंजय मुंडे दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका. पण दोषींवर कारवाई करा. आरोपींना फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी यावेळी केली.
Dhananjay Deshmukh on Walmik Karad B team
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आता धनंजय देशमुख यांनी सांगितलेल्या वाल्मिक कराडच्या कथित बी टीमवर कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :