Sanjay Raut । हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षात घरगड्यासारखी वागणूक दिली गेली असा आरोप करत उठाव केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले होते. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे.
“एकनाथ शिंदे यांनी उठाव वगैरे काही केला नाही. ते ईडीला (ED), सीबीआयला (CBI) घाबरून पळाले आहेत. जर ते घरगडी असते तर त्यांना कोणी आमदार केले असते का? त्यांना इतके वर्ष मंत्रीमंडळात नगरविकास खात्यासारखे महत्वाचे खाते दिले असते का?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
“मुख्यमंत्री हे कधीच नगरविकास खाते सोडत नाही. पण जे नगरविकास खाते मुख्यमंत्र्याकडे असायला हवं, ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्याला म्हणजे एकनाथ शिंदे यांना दिले होते. एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, “सध्या राजकीय वर्तुळात महायुतीच्या नेत्यांमध्ये तंगड्यात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू असल्याने एकनाथ शिंदेंनी मला शहाणपणा शिकवू नये. एकेकाळी ते माझे अतिशय घनिष्ट मित्र होते. संपूर्ण न्यायव्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन सरकार टिकवलं आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Sanajy Raut on Ekanth shinde and Rajan Salavi
“शरद पवारांनी (Sharad Pawar) एकनाथ शिंदेंसारख्या लोकांना पुरस्कार द्यायला नको होता, ते भीष्म पितामह आहेत. महादजी शिंदे (Mahadji Shinde) हे दिल्लीपुढे कधी झुकले नाही. राजन साळवींसारखे लोक आहेत, त्यांना आम्ही गांडू म्हणतो, अशी असंसदीय भाषा संजय राऊत यांनी वापरली. मी शरद पवार यांच्यावर टीका केली नसून मी फक्त पक्षाची भूमिका मांडली. मोदी, शाह यांनी शरद पवारांवर टीका केली, तेव्हा आम्हीच त्यांच्यासोबत होतो,” असेही मत राऊत यांनी मांडले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विरुद्ध संजय राऊत असा संघर्ष निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. राऊत यांच्या टीकेवर आता शिंदे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :