🕒 1 min read
IPL 2025 । चाहत्यांमध्ये आयपीएल 2025 स्पर्धेची मोठी उत्सुकता आहे. गेल्यावर्षी केकेआरने (KKR) विजेतेपद जिंकले होते. यंदाही केकेआर विजेतेपद जिंकणार की दुसरा संघ विजेतेपद जिंकणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अशातच आता आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Indian Premier League 2025 Updates)
आयपीएलचे (IPL) संभाव्य वेळापत्रक समोर आले असून पहिला सामना ईडन गार्डनवर (Eden Garden) होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि केकेआरमध्ये पहिला सामना असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलचा अठरावा हंगाम 21 मार्चऐवजी 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे परंपरेनुसार, यावेळी सलामीचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. तसेच मागील हंगामातील उपविजेता सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) देखील त्यांच्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळेल.
बीसीसीआयकडून अजूनही IPL बाबत अधिकृतपणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. पण, बोर्डाने अनौपचारिकरित्या फ्रँचायझींसोबत महत्त्वाच्या सामन्यांच्या तारखा शेअर केल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मे रोजी ईडन गार्डन्स येथे अंतिम सामना होईल.
IPL 2025 SCHEDULE UPDATE
सुरुवातीला बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांच्याकडून आयपीएल 23 मार्च रोजी सुरू होईल असे संकेत देण्यात आले होते. पण बीसीसीआयने आता या तारखांमध्ये बदल केल्याचे पाहायला मिळत असून संपूर्ण वेळापत्रक एक ते दोन दिवसांत जाहीर होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde यांना न्यायालयाने बजावली नोटीस; मुंडेंना मोठा धक्का
- “मातोश्रीकडे हम दो, हमारे दो एवढेच…”; Ramdas Kadam यांचा सूचक इशारा
- सरकारने मान्य केल्या मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या, उपोषणाबाबत Manoj Jarange म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











