Dhananjay Munde । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंडे यांच्या कार्यकाळातील बीड जिल्हा नियोजन समितीमधील निधी वितरणातील अनियमिततेचा प्रश्न समोर आला आहे. विरोधकांनी त्यांना राजीनाम्याच्या मागणीवरून (Dhananjay Munde resignation demand) घेरले आहे.
इतकेच नाही तर धनंजय मुंडे यांच्यावर देखील राजीनाम्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
करुणा मुंडे यांनी केलेले आरोप आणि सतत होणाऱ्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याने देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांशी अजित पवारांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान अजित पवारांनी मुंडेंची पाठराखण केली आहे.
“जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर पक्ष कोणतीही कारवाई करणार नाही. धनंजय मुंडे दोषी नाही तर त्यांच्यावर कारवाई नाही,” अशी रोखठोक भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. यामुळे धनंजय मुंडेंना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Ajit Pawar on Dhananjay Munde resignation demand
अजित पवार यांच्या भूमिकेमुळे विरोधकांना खूप मोठा चपराक बसला आहे. अजित पवार यांनी यापूर्वीही धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. आताही त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :