Share

“ढेकळांचे पंचनामे करायचे का?” कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान!

Maharashtra Agri Minister Manikrao Kokate says “What’s the use of assessing harvested crops? Should we assess clods?”—sparks controversy among farmers.

Published On: 

Maharashtra Agri Minister Manikrao Kokate says “What’s the use of assessing harvested crops? Should we assess clods?”—sparks controversy among farmers.

नाशिक, प्रतिनिधी: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नवीन चर्चेला तोंड दिलं आहे. कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्या दरम्यान त्यांनी वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे विधान कृषीमंत्री कोकाटेंनी केले आहे.

शेतकरी यावर्षी अवकाळी पावसाने होरपळले आहेत. कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळी कोकाटेंचं हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहे.

Manikrao Kokate’s Controversial Remark on Crop Damage

पत्रकारांनी विचारले असता की, उभ्या पिकांचे पंचनामे होत आहेत पण काढणी झालेल्या पिकांचं काय? यावर उत्तर देताना कोकाटे म्हणाले, “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले.”

या वक्तव्यानंतर शेतकरी संघटनांनी आणि विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. “शेतकरी संकटात असताना अशा प्रकारची टीका असंवेदनशील आहे,” अशी टीका केली आहे.

मागील काही दिवसांत महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला असून राज्यात हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाली आहे. अशा संकटात सरकारने तत्काळ मदतीचे आश्वासन दिलं असलं, तरी कोकाटेंच्या विधानामुळे सरकारची विश्वासार्हता पुन्हा प्रश्नाच्या भोवऱ्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही