पुणे । वांद्रे फॅमिली कोर्टाने मंत्री धनंजय मुंडेंना दणका देत, करुणा मुंडेंना ( Karuna Munde ) दर महिन्याला 1 लाख 25 हजार आणि मुलगी शिवानी मुंडे (Shivani Munde) लग्नापर्यंत मासिक 75 हजार रुपये पोटगी द्यावी लागणार असल्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. इतकेच नाही तर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती.
फॅमिली कोर्टाच्या आदेशानंतर करुणा मुंडे म्हणाल्या “पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मला मान्य केलं आहे. करुणा शर्मा नको, मला करुणा मुंडे म्हणा. हा माझा अधिकार आहे, मी लढा दिला आहे. मी मोठी किंमत चुकवली आहे. त्यामुळे मला करुणा धनंजय मुंडे म्हणा” अशी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
Karuna Munde Praise Devendra Fadnavis
दरम्यान, करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.“मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप-खूप आभार मानते. आज परळी, बीडमध्ये जे चांगले एसपी नवनीत कॉवत (Navneet Kanwat) साहेब पाठवले, त्यांचं खूप चांगल काम चालू आहे. जे परळीत गुंड आहेत, त्यांना उचलून जेलमध्ये टाकण्याच जे काम सुरु आहे, त्याच्यासाठी मी फडणवीस साहेबांचे खूप-खूप आभार मानते. फडणवीस साहेब मी तुम्हाला लवकरच पुराव्यांसह भेटणार. एक बहिण म्हणून मला न्याय द्या” असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी, ‘धनंजय मुंडेंवर देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त ते विरोधी पक्षनेते असल्यापासूनच आहे. त्यानंतर अजित पवार तर पाठीशी असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला होता.
‘जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसमोर वाल्मिक कराडनं मला कानशिलात लगावून, मला नको त्या पद्धतीनं स्पर्श करुन गेला. तेव्हा दिपा मुधोळ मुंडे जिल्हाधिकारी होत्या. सीसीटीव्ही फुटेज समोर आलं तर मुधोळ यांची नोकरी जाईल. त्यांनी या प्रकरणातील पुरावे नष्ट केले. डीजी, फडणवीसांना मी मारहाणीबद्दल तक्रार केली. पण माझी तक्रार घेतली गेली नसल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या