🕒 1 min read
Manoj Jarange Patil । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत देशमुखांना न्याय मिळावा अशी मागणी सातत्याने करत आहेत. अशातच आता त्यांनी याप्रकरणी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
“संतोष देशमुख यांचे मारेकरी फरार असताना कोणाच्या घरी होते, हे सगळं चार्जशीटमध्ये आले पाहिजे. यातील मुख्य नेता कोण? याची देखील चौकशी झाली व्हावी. आरोपींना ज्या पोलिसांनी सहकार्य केले त्यांना अजून बडतर्फ का केले नाही? तसेच आरोपींच्या संपत्तीची देखील चौकशी का केली नाही?” असा प्रश्न जरांगे पाटील यांनी केला आहे.
“वाल्मिक कराडला (Walmik Karad) काहीच झाले नाही नसताना त्याला आयसीयूमध्ये का दाखल केले? बाकीचे सह आरोपी का नाही केले? त्यांची चौकशी करून सोडून देता. त्यामुळे आता सरकार पुरावे नष्ट करुन या आरोपींची सुटका करणार की काय? अशी शंका देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केली.
Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh murder case accused
“आरोपींचे करोडो रुपयांचा घोटाळा समोर आला. इतकेच नाही तर पळून जाताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये सापडले. तरीही या आरोपींवर कारवाई होत नाही. दररोज या संदर्भात अनेक पुरावे समोर येत आहे. खंडणी मागणारे हेच आणि खून करणारे सुद्धा हेच आहेत,” असा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला.
तसेच जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते. परंतु, त्यांनी आपले उपोषण 15 दिवसांसाठी पुढे ढकलले आहे. इतर मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना… “; Manikrao Kokate यांचे वादग्रस्त वक्तव्य
- Karuna Munde यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले; धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा?
- “वाल्मिक कराडची बी टीम आम्हाला धमकावतेय”; Dhananjay Deshmukh यांचा खळबळजनक आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











