Share

छत्रपती संभाजीनगरात भाजपचा ‘गेम’ होणार? गुप्त बैठकीत मराठा समाजाचा एल्गार; जरांगे पाटलांचा थेट इशारा!

Major political drama in Chhatrapati Sambhajinagar as Maratha community holds a secret meeting against BJP’s ticket distribution strategy. Manoj Jarange warns of consequences.

Published On: 

Major political drama in Chhatrapati Sambhajinagar as Maratha community holds a secret meeting against BJP's ticket distribution strategy. Manoj Jarange warns of consequences.

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर: “गरज सरो आणि वैद्य मरो” ही म्हण राजकारणात तंतोतंत लागू पडते, पण जेव्हा एका संपूर्ण समाजाला ( Maratha Community ) केवळ ‘व्होटबँक’ म्हणून वापरून नंतर बाजूला सारलं जातं, तेव्हा त्या असंतोषाचा स्फोट कसा होतो, हे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय. २०२६ च्या सुरुवातीलाच भाजपसाठी एक धोक्याची घंटा वाजली आहे. शहरात नुकत्याच पार पडलेल्या मराठा समाजाच्या’अत्यंत गुप्त बैठकीने’ भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजातील तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची एक खाजगी बैठक पार पडली. या बैठकीचा सूर एकच होता “भाजपमध्ये मराठ्यांचा केवळ वापर आणि अपमान सुरू आहे.” सत्तेची फळे चाखताना मात्र ती मराठा समाजाला न देता, इतरांच्या पदरात टाकली जात आहेत, अशी तीव्र भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

Maratha Community Secret Meeting

कोणाच्या हातात आहे भाजपचा ‘रिमोट’?

या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी थेट नेत्यांची नावे घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे राजकारण हे आता पूर्णपणे ‘नॉन-मराठा’ नेत्यांच्या हातात गेल्याचा आरोप होतोय. अतुल सावे, डॉ. भागवत कराड आणि शिरीष बोराळकर ही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. “पक्षासाठी मरमर मरायचं आम्ही आणि मलाई खायची दुसऱ्यांनी?” असा सवाल आता सामान्य मराठा कार्यकर्ता विचारू लागला आहे.

वादाची मुख्य ठिणगी पडली ती तिकीट वाटपाच्या गणितावरून. संभाजीनगर महानगरपालिकेत एकूण ११५ वॉर्ड आहेत. यातील तब्बल ६० ते ७० वॉर्डांमध्ये मराठा समाजाचे वर्चस्व आहे. लोकसंख्येच्या आणि प्रभावाच्या जोरावर या समाजाने ५० टक्क्यांहून अधिक जागांची अपेक्षा ठेवली होती.

पण सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या रणनीतीकारांनी मराठा समाजाला ( Maratha Community ) केवळ ३० ते ३५ टक्के (३५ ते ४० जागा) देण्याचे ठरवले आहे. इतर मागासवर्गीयांना (OBC) आणि इतर समाजाला झुकते माप देत त्यांना ५० पेक्षा जास्त जागा देण्याचा घाट घातला जात आहे. ज्यांनी पक्ष वाढवला, त्यांनाच उमेदवारीपासून डावललं जात असल्याने, या गुप्त बैठकीत “भाजपला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशी शपथच कार्यकर्त्यांनी घेतल्याचं समजतंय.

एकीकडे स्थानिक धुसफूस सुरू असतानाच, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी यात उडी घेतल्याने वातावरण चांगलंच तापलंय. मराठा समन्वयक पूजा मोरे यांना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केल्याचा प्रकार समोर आला. यावरून जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत.

त्यांनी भाजपला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे, “एका ताईला त्रास दिला, तर तिचे हजारो भाऊ संरक्षणासाठी उभे राहतील. हे खपवून घेतले जाणार नाही. याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील.” जरांगे पाटलांनी थेट ‘दुष्परिणाम’ भोगण्याचा इशारा दिल्याने, आता हा वाद केवळ संभाजीनगरपुरता मर्यादित राहिला नसून, त्याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची ( Maratha Community ) ही नाराजी भाजपला परवडणारी आहे का? आणि ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी आता वरिष्ठ नेते यात लक्ष घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या